बीड – जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आलेख कमी होताना दिसत नसल्याचे चित्र आहे .शुक्रवारी पाच हजारापेक्षा जास्त तपासण्या करण्यात आल्या.त्यामध्ये तब्बल 121 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .
जिल्ह्यातील अंबाजोगाई 3,आष्टी 29,बीड 37 ,धारूर 11,गेवराई 10,केज 13,माजलगाव 1,पाटोदा 9,शिरूर 2,वडवणी मध्ये 6 रुग्ण आढळून आले आहेत .
जिल्ह्यातील रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे चित्र असून गेल्या महिनाभरात रुग्णसंख्या शंभर ते दिडशे च्या आसपास आहे .जिल्ह्यातील निर्बंध कमी करण्यात आले आहेत,मात्र रुग्णसंख्या कमी होत नसल्याने चिंता कायम आहे .