बीड- जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या विविध मागण्यांसाठी बीड जिल्हा इंग्लिश स्कुल ट्रस्टीज असोसिएशनने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.या आंदोलनाला बीडचे आ संदिप क्षीरसागर यांनी भेट देऊन चर्चा केली.
जिल्ह्यातील इंग्रजी शाळांमध्ये गेल्या पाच सहा वर्षात आरटीइ अंतर्गत जे प्रवेश झाले आहेत त्यांची प्रतिपूर्ती देयके अद्याप शासनाने दिलेली नाहीत .तसेच आरटीइ अंतर्गत प्रवेश प्रक्रिया करताना शिक्षण विभागाकडून अडवणूक अन पिळवणूक केली जाते .2020- 21 या वर्षासाठी शासनाने 15 टक्के फिस सवलत योजना लागू केली आहे तो आदेश मागे घेण्यात यावा,यासह विविध मागण्यांसाठी संस्था चालकांनी धरणे आंदोलन केले .

यावेळी बीडचे आ संदिप क्षीरसागर यांनी आंदोलन कर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली.यावेळी अध्यक्ष विजय पवार,सचिव गणेश मैड,कोषाध्यक्ष अखिलेश ढाकणे यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक उपस्थित होते .