September 27, 2021

सेवा सोसायटीच्या प्रशासक नियुक्ती जैसे थे ठेवण्याचे आदेश !

सेवा सोसायटीच्या प्रशासक नियुक्ती जैसे थे ठेवण्याचे आदेश  !

बीड- बीड तालुक्यातील 41 सेवा सोसायटीवर बेकायदेशीरपणे अशासकीय प्रशासकांच्या करण्यात आलेल्या नियुक्त्याना उच्च न्यायालयात आवाहन देण्यात आले असून न्या आर एन लड्डा,व न्या एस व्ही गंगापूरवाला यांनी आपल्या निकालात अशासकीय नियुक्त्या पुढील आदेश येइपर्यंत जैसे स्थिती ठेऊन नियुक्त केलेल्याना प्रतिवादी करण्याचे आदेश दिले असल्याने चांगलीच चपराक बसली आहे

सन 2019- 20 मध्ये बीड तालुक्यातील 41 सेवा सोसायटीच्या मुदती संपल्या होत्या यावर सोसायटी संस्थांनी उपनिबंधक यांच्याकडे मतदार याद्या देणे अपेक्षित होते परंतु या संस्थांनी मतदार याद्या देण्यात दिरंगाई दाखवली तसेच कोरोना महामारी मुळे सेवा संस्थांच्या निवडणुकाही होऊ शकल्या नाहीत, या संस्थांचा कारभार पाहण्यासाठी संचालक मंडळ बरखास्त करून शासकीय प्रशासक नेमण्यात आले मात्र काही राजकीय पुढाऱ्यांनी राजकीय हेतूने काही महिन्यापूर्वी अशासकीय प्रशासक नेमले होते या अन्यायकारक निवडीवर दाद मागण्यासाठी विविध सेवा सोसायटीच्या संचालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती

याचिकेत अशासकीय प्रशासक मंडळ नेमताना कोणतेही निकष न लावता शासकीय प्रशासकावर गैर विश्वास दाखवून अशासकीय व्यक्तीची नेमणूक करणे योग्य नाही असा युक्तिवाद करण्यात आला आहे न्यायालयाने या निवडीबाबत निकाल देताना अशासकीय प्रशासकीय मंडळ यांना प्रतिवादी करून पुढील आदेश येईपर्यंत जैसे थे नियुक्त्या राहतील असे म्हटले आहे,कार्यकर्त्यांना आणि बगलबच्च्यांना खुश ठेवण्याकरता करण्यात आलेल्या बेकायदेशीर निवडीवर न्यायालयाने पुढील आदेश येईपर्यंत जैसे थे परिस्थिती ठेवावी असे आदेश दिल्यामुळे राजकीय हेतू साध्य करणारांना चांगलीच चपराक बसली आहे याचिका कर्त्याच्या वतीने ऍड नितीन गवारे पाटील यांनी काम पाहिले

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *