बीड – बीड जिल्ह्यात आज दि 25 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4312 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 78 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 4234 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात आष्टी 33 बीड 12 धारूर 6 गेवराई 1 केज 5 माजलगाव 2 पाटोदा 6 शिरूर 6,वडवणी 8 असे रुग्ण आढळून आले आहेत
राज्यात कोरोनाची दुसरी लाट अद्यापही ओसरलेली दिसत नाही. राज्यात अजूनही रोजच्या रोज मोठ्या प्रमाणावर नवे कोरोना रुग्ण समोर येतच आहेत. आज राज्यात तब्बल ४ हजार ३५५ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ११९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे
आतापर्यंत राज्यात एकूण १,३६,३५५ करोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, राज्यातील मृत्यूदर २.११ टक्के आहे. तसेच आतापर्यंत राज्यात एकूण ६२,४३,०३४ करोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील कोरोना रिकव्हरी रेट सध्या ९७.०५ टक्के एवढे आहे. राज्यातील एकूण करोनाबाधितांचा आकडा ६४,३२,६४९ वर पोहोचला आहे.
देशात 25467 नव्या रुग्णांची नोंद
देशातील कोरोनाची दुसरी लाट अद्यापही ओसलेली नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 25 हजार 467 नवे रुग्ण आढळून आले. तर 354 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, 39 हजार 486 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तत्पूर्वी, सोमवारी देशात 25,072 नवे कोरोनाबाधित आढळून आले होते