September 27, 2021

नारायण राणे यांना जामीन मंजूर !

नारायण राणे यांना जामीन मंजूर !

महाड – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतर त्यांच्या जामीन अर्जावर महाड न्यायालयात सुनावणी झाली.यावेळी न्यायालयाने राणे यांना जामीन मंजूर केला.राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्याप्रकरणी राणे यांना मंगळवारी दुपारी पोलिसांनी अटक केली होती .

जन आशीर्वाद यात्रेदरम्यान मंत्री राणे यांनी महाड मध्ये पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती.त्यानंतर राणे यांच्याविरुद्ध राज्यभरात शिवसैनिक आक्रमक झाले होते.विशेषतः मुंबई, कोकण भागात शिवसेना विरुद्ध भाजप आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले.

राणे यांच्या अटकेनंतर त्यांना रात्री उशिरा महाड पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते.त्यानंतर राणे यांना महाड न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर राणे यांना जामीन मंजूर केला .त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.यावेळी राणे यांच्यासोबत माजी आ प्रसाद लाड,आ नितेश राणे,निलेश राणे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *