बीड – जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा रविवारी शंभरच्या आत आल्याचे दिसून आले.4119 रुग्णांची तपासणी केली असता त्यात 71 पॉझिटिव्ह आणि 4048 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत .गेल्या आठ दहा दिवसापासून रुग्णसंख्येत कमालीची घट होत असल्याचे दिसून येत आहे .
जिल्ह्यातील अंबाजोगाई 6,आष्टी 8,बीड 24,धारूर 2,गेवराई 2,केज 10,माजलगाव 2,परळी 1,पाटोदा 6,शिरूर 4 आणि वडवणी मध्ये 6 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत .
जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा कमी होत असल्याचे चित्र असून शासकीय रुग्णालय वगळता इतर ठिकाणचे कोविड केयर सेंटर बंद करण्यात आले आहेत .