बीड – जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा शनिवारी पुन्हा एकदा 115 वर जाऊन पोहचला .4221 रुग्णांची तपासणी केली असता 4106 रुग्ण निगेटिव्ह तर 115 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे आष्टी तालुक्यातील आहेत .
जिल्ह्यातील अंबाजोगाई 6,आष्टी 44,बीड 12,धारूर 17,गेवराई 5,केज 13,माजलगाव 3,परळी 1,पाटोदा 8,शिरूर 2 आणि वडवणी मध्ये 4 रुग्ण आढळुन आले आहेत .
जिल्ह्यातील रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे चित्र आहे मात्र तरीदेखील नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे .