बीड – जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांची बदली झाली असून त्यांच्या जागी जात पडताळणी पुणे विभागाचे अध्यक्ष अजित पवार हे बीडला येत आहेत .कुंभार यांची बृहन मुंबई महापालिकेचे सहआयुक्त म्हणून रुजू होतील .
राज्य शासनाने भारतीय प्रशासकीय सेवेतील काही अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश शुक्रवारी काढले .यामध्ये गेल्या तीन वर्षांपासून बीड येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले अजित कुंभार यांची बदली झाली असून त्यांच्या जागी अजित पवार हे येत आहेत .
कुंभार यांची बीड येथील कारकीर्द अत्यंत चांगली राहिली आहे .कोरोनाच्या काळात त्यांनी केलेल्या कार्यामुळे बीड जिल्ह्यात कोरोना आटोक्यात येण्यास मदत झाली होती .