बीड – येथील श्रीराम नगर भागात राहणारे महारुद्र शिंदे यांच्या डॉक्टर मुलाच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे.नाशिकच्या वसंतराव पवार मेडिकल कॉलेज मध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ या विषयात शिक्षण घेणाऱ्या स्वप्नील शिंदे याने रॅगिंग ला कंटाळून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे .या प्रकरणात मंत्री अमित देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत .
स्वप्नील महारुद्र शिंदे हा कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमधून 2018ला MBBS झाला. अत्यंत हुशार असलेल्या स्वप्नीलनं चक्क गोल्ड मेडल मिळवलं. आपल्या MBBS शिक्षणासाठीही स्वप्नीलला, सरकारी कोट्यातून मेरिटवर ऍडमिशन मिळाली होती. आपल्या अभ्यासू गुणांनी स्वप्नील हा विद्यार्थ्यांत लोकप्रिय होता मात्र त्याच्या याच हुषारीचा काहींना अतोनात राग होता. नाशिकला तेच झालं आणि त्याच्या सिनिअर असलेल्या 2 विद्यार्थिनींनी त्याचा छळ सुरू केल्याचा आरोप त्याचे वडील महारुद्र शिंदे यांनी केला आहे.
वैद्यकीय उच्च शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. स्त्रीरोगतज्ज्ञ या 3 वर्षांच्या अभ्यासक्रमासाठीही डॉ स्वप्नीलला त्याच्या हुशारीनं, सरकारी कोट्यात प्रवेश मिळाला होता. त्याचं हे पहिलं वर्ष… शेतकरी कुटुंबातील स्वप्नीलची अखेर अश्या पध्दतीनं झाल्यानं हळहळ व्यक्त होत असली तरी रॅगिंग अजूनही होत असल्याची माहिती समोर आल्यानं, कायदे किती तोकडे आहे याची जाणीव होतेय.