बीड- गेल्या तीन चार दिवसांपासून कोरोना बाधितांचा आकडा कमी होत असून बुधवारी देखील केवळ 100 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत .चार साडेचार हजार रुग्णांची तपासणी केली असता केवळ 100 पॉझिटिव्ह आल्याने पॉझिटिव्हीटी रेट देखील कमी होत असल्याचे चित्र आहे .
बीड जिल्ह्यात आज दि 18 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 5830 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 100 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 5730 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण जिल्ह्यात अंबाजोगाई 8 आष्टी 22 बीड 25 धारूर 7 गेवराई 5 केज 8 माजलगाव 4 पाटोदा 11 शिरूर 4 वडवणी 6 असे रुग्ण आढळून आले आहेत
जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी होत असली तरीदेखील नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे .