बीड – येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक भारत राऊत यांची विनंतीवरून लाच लुचपत प्रतिबंधक विभागात बदली झाली आहे .त्यांच्या बदलीचे आदेश अप्पर पोलीस महासंचालक कुलवंत सारंगल यांनी काढले आहेत .
राज्यातील 1462 पोलीस निरीक्षक, सहायक पोलिस उपनिरीक्षक यांच्या विनंती बदलीचे आदेश 14 ऑगस्ट रोजी काढण्यात आले आहेत .गेल्या दोन वर्षांपूर्वी बीडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात रुजू झालेले पोलीस निरीक्षक भारत राऊत यांनी बदलीसाठी अर्ज केला होता .
त्यांच्या बदलीचा अर्ज स्वीकृत झाला असून त्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागात बदली करण्यात आली आहे .गेल्या दोन वर्षांच्या काळात राऊत यांनी अनेक खून,दरोडे,मोटारसायकल चोरी चे गुन्हे उघडकीस आणले होते .त्यांच्या कार्यकाळात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात एक शिस्त लागली होती .
एक शांत स्वभावाचा अधिकारी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती .