February 2, 2023

राजा माणूस ………!

राजा माणूस ………!

लक्ष्मीकांत रुईकर / सहसा पोलीस म्हंटल की सर्वसामान्य माणसाला धडकी भरते,मात्र खकीवर्दी मध्ये देखील माणुसकी असलेले लोक कमी नाहीत.शासकीय नोकरी करताना सामाजिक कामात,मित्र मैत्रिणी, परिवार ,नातेवाईक यांच्या सुखदुःखात खंबीरपणे पाठीशी उभा राहणारा असाच एक पोलीस म्हणजे सूर्यकांत उर्फ राजाभाऊ तुकाराम गुळभिले. खरोखरच राजा माणूस .*जे जे आपणासी ठावे ते ते इतरांसी सांगावे,शहाणे करून सोडावे सकळ जन* या उक्तीप्रमाणे आयुष्य जगलेल्या या राजा माणसाचे मनापासून अभिनंदन .


तुकाराम गुळभिले या माणसाने आपलं आयुष्य वर्दीची सेवा इमाने इतबारे करण्यात घालवल. *शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी* अस म्हणतात त्याप्रमाणे वडिलांच्या आदर्शावर चालत चालत आज राजाभाऊ ने राष्ट्रपती पदक प्राप्त करत गुळभिले खानदानी चा झेंडा अटकेपार फडकविला आहे .


32 वर्षांपूर्वी पोलीस दलात सहभागी झालेल्या राजाभाऊ यांनी आपल्या नेटवर्क च्या जोरावर अनेक कठीण तपास सहजपणे लावले.गेल्या 32 वर्षीच्या काळात दोन हजार पेक्षा जास्त रिवार्ड मिळणारा राजभाऊ एकमेव असेल .


या माणसाच्या सानिध्यात एकदा माणूस आला की आयुष्यभरासाठी  तो जोडला जातो .परळी,बीड,आष्टी, अंभोरा,बीड शहर,पेठ बीड ,स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग अशा अनेक ठिकाणी नोकरी केल्याने राजाभाऊ चे नेटवर्क एकदम तगडे आहे .जिल्ह्यातच काय पण जिल्ह्याबाहेर देखील या माणसाने आपल्या कामातून वेगळा ठसा उमटवला आहे .


जेवढे मित्र तेवढ्याच मैत्रिणी अन या सगळ्यांच्या सुखदुःखात धावून जाणारा असा हा खाकीतला माणुसकी असलेला माणूस .या माणसाचा मित्र मैत्रिणींचा गोतावळा एवढा मोठा आहे की दिवसभरात कानाला फोन चिटकलेला असतो .कोणाला काही आर्थिक किंवा मानसिक मदत हवी असेल तर हा माणूस अर्ध्या रात्री हजर असतो .


अत्यंत कडक शिस्तीचा हा माणूस एक प्रेमळ अन भावनाशील बाप देखील आहे हे पोरीच्या लग्नात अनेकांनी पाहिलं आहे.यांच्या पोरींच्या लग्नात जो तो आपल्या घरातील कार्य असल्याप्रमाणे काम करत होता .शासकीय सेवेत असताना पायी दिंडी घेऊन जाणारे वारकरी असोत की नैसर्गिक आपत्ती आल्याने उध्वस्त झालेले लोक असोत हा माणूस कायम मदतीसाठी तत्पर असतो .अनेकांचे संसार उभे करून या माणसाने त्यांचे आशिर्वाद घेतले आहेत .


पोलीस सेवेत असताना सगळं काही हातात दंडुक घेऊनच नीट करता येत या गोष्टीला फाटा देत या माणसाने केवळ आपल्या बोलण्यातून अनेकांना शिस्तीचे धडे दिले आहेत .अनेक अधिकाऱ्यांशी या माणसाने कौटुंबिक संबंध प्रस्थापित केले आहेत .चार वर्षांपूर्वी पोलीस महासंचालक पदक मिळाल्यानंतर राजाभाऊंनी राष्ट्रपती पदक मिळावे म्हणून तयारी सुरू केली होती .त्याला यंदा यश मिळालं .


आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो हे कायम स्मरणात ठेवून शासकीय सेवे सोबतच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या राजा मनाच्या माणसाला ,आमच्या मित्राला राष्ट्रपती पदक प्राप्त झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click