बीड – बीड पोलीस दलात गुणवत्तापूर्ण सेवेसाठी चे राष्ट्रपती पदक येथील महिला व बालहक्क विभागात कार्यरत असणारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत तुकाराम गुळभिले यांना जाहीर झाले आहे .गुळभिले हे राष्ट्रपती पदक मिळवणारे जिल्ह्यातील यावर्षीचे एकमेव पोलीस अधिकारी आहेत .त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .राज्यातील 67 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना यावर्षी चे राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे .
बीड पोलीस दलात गेल्या 32 वर्षांपासून निष्काम सेवा करणारे सूर्यकांत गुळभिले यांना चार वर्षांपूर्वी पोलीस महासंचालक यांच्या पदकाने गौरविण्यात आले आहे .गेल्या 32 वर्षात पेठ बीड,बीड शहर,आष्टी,अंभोरा,परळी यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात त्यांनी चोख कामगिरी बाजवली आहे .
अनेक कठीण आणि क्लिष्ट तपास त्यांनी लावले आहेत .बीड पोलीस दलातील एक माणुसकी असलेला अधिकारी म्हणून त्यांचा परिचय आहे .जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते 15 ऑगस्ट 2021 रोजी त्यांचा या निमित्ताने गौरव केला जाणार आहे .
राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक कुलवंत कुमार सारंगल यांनी याबाबत परिपत्रक काढून माहिती दिली आहे .