September 27, 2021

जिल्ह्यातील पाचशे ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक आणि बीडीओ ना नोटीस !!

जिल्ह्यातील पाचशे ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक आणि बीडीओ ना नोटीस !!

बीड – पंचायत समिती मध्ये झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणात जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांची उचलबांगडी थेट न्यायालयाने केल्यानंतर प्रशासन जागे झाले .बीड जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील तब्बल पाचशे ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत .एवढ्या मोठ्या प्रमाणात नोटिसा बजवल्याने खळबळ उडाली आहे .

बीड जिल्ह्यात परळी,बीड,अंबाजोगाई, केज,माजलगाव, वडवणी, शिरूर,धारूर,गेवराई, आष्टी आणि पाटोदा या तालुक्यात 2010 ते 2020 या दहा वर्षात जिल्ह्यातील वेगवेगळ्या ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असलेल्या पाचशेहून अधिक ग्रामसेवक ग्रामरोजगार सेवकांना त्या त्या तालुक्यातील गटविकास अधिकाऱ्यांनी नोटिसा बजावल्या आहेत. यात संबंधित ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या गैरप्रकाराचा उल्लेख असून त्यावर तात्काळ खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे ज्या ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या नरेगाच्या कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. यासोबतच ज्या कामाच्या ऑडिटनंतर काम नियमबाह्य झाले असल्याचे पुढे आले होते. त्याच ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि ग्रामसेवक तसेच रोजगार सेवकांना प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस दिल्या आहेत यानंतर या नोटिशीला तीन दिवसात उत्तर मागितले आहेत.

नरेगाच्या कामामध्ये घोटाळ्याच्या तक्रारी होणे ही काही नवी बाब नाही मात्र या संदर्भामध्ये प्रशासनाकडून वेळीच उपाययोजना करण्यात आली नाही म्हणूनच अखेर राजकुमार देशमुख यांनी यासंदर्भात न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने या संदर्भात कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. विशेष म्हणजे याच कामात तपासणीत दिरंगाई केल्याचा ठपका ठेवत न्यायालयाने बीडचे जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांची बदली करा असा आदेश काढला होता.

बीड जिल्ह्यातील 11 तालुक्यात म्हणजे गेवराई, आष्टी, पाटोदा,शिरूर,केज, धारूर, माजलगाव, अंबाजोगाई, परळी आणि वडवणी या अकरा ही तालुक्यातील पंचायत समिती मार्फत या ग्रामपंचायत सरपंच ग्राम रोजगार सेवक आणि ग्रामसेवकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात लोकप्रतिनिधी आणि शासकीय कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्याची की पहिलीच वेळ असावी.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *