बीड – जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येचा चढ उतार सुरूच आहे,रविवारी दोनशेच्या घरात असलेली रुग्णसंख्या सोमवारी 167 वर येऊन थांबली . सोमवारी 3648 रुगांमध्ये 167 पॉझिटिव्ह तर 3481 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत .
गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. आज आरोग्य विभागाला 3 हजार 648 संशयितांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 3 हजार 481 जण निगेटिव्ह तर 167 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
आजच्या अहवालात आलेल्या पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई 5, आष्टी 39, बीड 55, धारूर 10, गेवराई 10, केज 13, माजलगाव 3 , परळी , पाटोदा 15 , शिरूर 16 आणि वडवणी तालुक्यात 1 रुग्ण आढळून आले आहेत.
जिल्ह्यातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे .रुग्णसंख्या कमी होत नसल्याने जिल्ह्यातील निर्बंध आजही कायम आहेत .