February 8, 2023

नीरज ठरला गोल्डमॅन !तर बजरंग पुनिया ला कांस्यपदक !!

नीरज ठरला गोल्डमॅन !तर बजरंग पुनिया ला कांस्यपदक !!

टोकियो – भारताचा खेळाडू अभिनव बिंद्रा नंतर नीरज चोप्रा ने भारताला ऑलम्पिक मध्ये गोल्ड मिळवून दिले.भालाफेक स्पर्धेत गोल्डमॅन नीरज ने मिळवलेल्या यशानंतर भारतात ठिकठिकाणी जल्लोष करण्यात आला,देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरज चे फोनवरून अभिनंदन केले आहे .कुस्तीमध्ये बजरंग पुनिया याने कांस्यपदक पटकावले आहे .

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील पुरुष भालाफेक गटात इंडियन आर्मी मॅन नीरज चोप्रानं इतिहास रचलाय. पात्रता फेरीतील कामगिरीत आणखी सुधारणा करत त्याने यंदाच्या स्पर्धेत तमाम भारतीयांना सोनेरी क्षणाची अनुभूती देणारी कामगिरी केली. सर्वात लांब भाला फेकत त्याने टोकियो ऑलिम्पिकमधील पहिले आणि आतापर्यंतच्या इतिहासातील दुसरे गोल्ड मिळवून दिलय.

नीरज चोप्रा आणि जर्मनीचा जोहान्स वेट्टर यांच्यात चुरस पाहायला मिळेल असे वाटत होते. पण जर्मनीच्या खेळाडूसह अन्य कोणत्याही खेळाडूला त्याच्या जवळपासही भाला फेकता आला नाही. 2008 मध्ये अभिनव बिंद्राने शूटिंगमध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले होते.

पात्रता फेरीत टॉपर राहिलेल्या नीरज चोप्राने फायनल इवेंटमध्ये पहिल्याच प्रयत्नात 87.03 मीटर भाला फेकला. दुसऱ्या प्रयत्नात त्याने आणखी जोर लावत 87.58 मीटर भाला फेकून प्रतिस्पर्धांना आणखी मागे टाकले. तिसऱ्या प्रयत्नात 76.79 मीटर भाला फेकला. चौथ्या प्रयत्नात तो फेल त्याची भाला फेक फॉल ठरली.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click