February 7, 2023

पारावर बसून आ संदिप क्षीरसागर यांनी सोडवले प्रश्न !!

पारावर बसून आ संदिप क्षीरसागर यांनी सोडवले प्रश्न !!

बीड (प्रतिनिधी):- गेल्या दशकभरापासून दफ्तर दिरंगाईत रखडलेल्या खडकीघाट येथील पुनर्वसनाचा प्रश्‍न आज अखेर आ. संदीप क्षीरसागर यांनी गावच्या पारावर बसून प्रशासकीय बैठक घेत निकाली काढण्याच्या सूचना दिल्या. तीन महिन्यात रखडलेले सर्व प्रश्‍न सोडवण्याचे आश्‍वासन या वेळी उपस्थित गावकर्‍यांना आमदार संदीप क्षीरसागर यांनी दिले.

2009 सालापासून सदरच्या पुनर्वसनाचा आणि तेथील नागरिकांना नागरी सुविधेचा प्रश्‍न भेडसावत होता.बीड तालुक्यातील खडकीघाट येथील पुनर्वसनाचा प्रश्‍न 2009 पासून रखडलेला आहे. कबाले वाटप करणे यासह नागरि सुविधा अद्याप उपलब्ध नव्हत्या. या बाबत स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी शासन-प्रशासन दरबारी मागणीही केली होती.

मात्र गावकर्‍यांच्या या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत होते. अखेर आज आ. संदीप क्षीरसागर यांनी खडकीघाट येथे जाऊन पारावर बसत येथील नागरिकांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी गावकर्‍यांसह अधिकार्‍यांसोबत बैठक घेतली. या वेळी जिल्हा पुनर्वसन अधिकारी आघाव, कार्यकारी अभियंता वानखेडे, तहसीलदार वमने, गटविकास अधिकारी मोराळे, जिचल्हा पुनर्वसन मंडळ अधिकारी सुत्रे, मंडळ अधिकारी सोळंके, वंजारे, सुरेश पाळदे, तलाठी राऊत हे उपस्थित होते. आतापर्यंत 190 पैकी 54 लोकांना कबाले दिले गेले आहेत. उर्वरित लोकांना तात्काळ कबाले देण्याचा निर्णय या वेळी झाला.

कबाले वाटप तसेच त्याच्या पावत्या हे संबंधितांना देण्यात येणार असून नागरी सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्यासाठी आ. क्षीरसागरांनी अधिकार्‍यांना सूचना केल्या आहेत. तीन महिन्यामध्ये या गावचे सर्व प्रश्‍न सोडवण्याचे सांगत गेल्या दहा वर्षांपासून खडकीघाट येथील पुनर्वसनाचा प्रश्‍न अखेर आज आ. संदीप क्षीरसागरांनी मार्गी लावल्याचे समाधान उपस्थित गावकर्‍यांनी व्यक्त केला.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click