नवी दिल्ली – कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका उंबरठ्यावर असताना आता नव्या डेल्टा व्हेरियन्ट ने चिंता वाढवली आहे .कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना देखील या विषाणूची लागण होऊ शकते असे संशोधनात समोर आले आहे .
डेल्टा विषाणूचा संसर्ग नाक आणि घशावाटे होतो. लसीकरण झालेले आणि लसीकरण न झालेले लोकं सारख्याच प्रमाणात या विषाणूचा प्रसार करू शकतात.
पण प्रत्येक वेळी असंच घडेल, हे मात्र नक्की नाही. डेल्टा विषाणू हा मर्स, सार्स, इबोला, सर्दीचा विषाणू, मोसमी फ्लू अशा विषाणूंइतकात वेगानं पसरतो. हा विषाणू कांजण्यांच्या विषाणू इतकाच संसर्गजन्य असल्याचं वृत्त आहे.
अलीकडेच अमेरिकेत देखील एक दुर्मिळ मंकीपॉक्स विषाणूची लागण झालेला एक रुग्ण आढळला आहे. टेक्सास प्रांतात हा रुग्ण आढळला असून तो नुकताच नायजेरियाला जाऊन परत आला होता. त्याच्यावर डलास येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अमेरिकेत या रोगाचा हा पहिलाच रुग्ण आढळला असल्याचं सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शननं म्हटलं आहे.