January 21, 2022

मराठा क्रांती भवनसाठी जागा उपलब्ध ! नगराध्यक्ष यांची शब्दपूर्ती !!

मराठा क्रांती भवनसाठी जागा उपलब्ध ! नगराध्यक्ष यांची शब्दपूर्ती !!

बीड (प्रतिनिधी) : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबीत असलेला बीड येथील ‘मराठा क्रांती भवन’ चा प्रश्न मार्गी लागला असून माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते भूखंड हस्तांतरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे या सुवर्णक्षणाचे साक्षीदार होण्यासाठी समाजातील संपूर्ण समाजबांधवांनी उद्या 1 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता राजमाता जिजाऊ उद्यानच्या बाजूला राजीव गांधी चौक येथे उपस्थित रहावे असे आवाहन सकल मराठा समाज बीड जिल्हा व छत्रपती सकल मराठा विकास संस्था बीडच्या वतीने करण्यात आले आहे.

बीड शहरामध्ये मराठा समाजासाठी हक्काची एखादी जागा असावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. समाजातील विविध संघटना आणि कार्यर्त्यांनी गेल्या काही दिवसांपासून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्याकडे ही मागणी लावून धरली होती. त्याच अनुषंगाने आता बीड शहरातील अगदी मोक्याच्या ठिकाणी म्हणजेच राष्ट्रमाता जिजाऊ उद्यान राजीव गांधी चौकामध्ये नियोजीत ‘मराठा क्रांती भवन’ निर्माण करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या ठिकाणी मराठा समाजातील मुलींसाठी सुसज्ज वसतिगृह, अभ्यासिका आणि समाजातील लोकांसाठी हक्काची जागा या माध्यमातून उपलब्ध होणार आहे,काही महिन्यांपूर्वीच नगराध्यक्ष डॉ भारत भूषण क्षीरसागर यांनी एका कार्यक्रमात लवकरच जागा उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले होते त्याची प्रत्यक्षात शब्दपूर्ती पूर्ण होत आहे .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

hotel_anvita

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click