बीड – जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या शुक्रवारी देखील कमी झाली नसल्याचे दिसून आले .5379 रुग्णांची तपासणी केली असता त्यात 180 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .
जिल्ह्यातील अंबाजोगाई 2,आष्टी 43,बीड 36,गेवराई 18,धारूर 13,केज 14,माजलगाव 5,परळी 2,पाटोदा 18,शिरूर 22 आणि वडवणी मध्ये 7 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत .
देशात गेल्या २४ तासात ४४ हजार २३० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. नव्या रुग्णांनंतर देशातील एकूण कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या ३ कोटी १५ लाख ७२ हजार ३४४ वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या असलेल्या राज्यांबद्दल बोलायचं तर केरळ पहिल्या क्रमांकावर असून महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे.