बीड – बीड जिल्ह्यात आज दि 29 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 5241 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 212 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 5029 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 3 आष्टी 72 बीड 34 धारूर 6 गेवराई 10 केज 12 माजलगाव 7 परळी 2 पाटोदा 17 शिरूर 37 वडवणी 13 असे रुग्ण आढळून आले आहेत
महाराष्ट्रात दिवसभरात ६ हजार ८५७ नवे कोरोना रुग्ण आणि २८६ मृत्यू झाले. राज्यातील कोरोना रुग्णांपैकी ६ हजार १०५ जण दिवसभरात बरे झाले. महाराष्ट्राचा मृत्यूदर २.१० टक्के, पॉझिटिव्हिटी रेट १३.२६ टक्के, रिकव्हरी रेट ९६.५३ टक्के आहे. राज्यात झालेल्या ४ कोटी ७३ लाख ६९ हजार ७५७ कोरोना चाचण्यांपैकी ६२ लाख ८२ हजार ९१४ पॉझिटिव्ह आल्या. राज्यातील ४ लाख ८८ हजार ५३७ जण होम क्वारंटाइन तर ३ हजार ३६४ जण संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाबाधीत झालेल्या ६२ लाख ८२ हजार ९१४ जणांपैकी ६० लाख ६४ हजार ८५६ जण झाले बरे. महाराष्ट्रात कोरोनामुळे १ लाख ३२ हजार १४५ मृत्यू तर ३ हजार ३६८ कोरोना रुग्णांचा इतर कारणाने मृत्यू झाल्याचे राज्य शासनाने सांगितले.सध्या महाराष्ट्रात ८२ हजार ५४५ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
२४ तासांत देशात ४३ हजार ६५४ नवीन करोना रुग्ण
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशात ४३ हजार ६५४ नवीन करोना रुग्ण आढळले. तर ६४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.