September 27, 2021

जिल्ह्यात बुधवारी 241 पॉझिटिव्ह !

जिल्ह्यात बुधवारी 241 पॉझिटिव्ह !

बीड – बीड जिल्ह्यात आज दि 28 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 5009 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 241 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 4768 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण जिल्ह्यात अंबाजोगाई 5 आष्टी 44 बीड 50 धारूर 16 गेवराई 29 केज 10 माजलगाव 5 परळी 1 पाटोदा 33 शिरूर 39 वडवणी 9 असे रुग्ण आढळून आले आहेत

राज्यात ६ हजार २५८ नव्या रुग्णांची नोंद

राज्यात करोना रुग्ण संख्येत झपाट्याने घट होत असून रुग्ण बरे होण्याचं प्रमण ९६.५४ टक्क्यांवर पोहोचलं आहे. राज्यात आज १२ हजार ६४५ रुग्णांनी करोनावर मात केली. त्यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा ६० लाख ५८ हजार ७५१ वर पोहोचला आहे. तर आज बरे झालेल्या रुग्णांच्या तुलनेत नव्या रुग्णांची संख्या कमी होती. राज्यात ६ हजार २५८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात एकूण ८२,०८२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात मागच्या २४ तासात २५४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे .सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ % एवढा आहे.

देशात २९ हजार ६८९ नव्या बाधितांचे निदान

सोमवारी देशात ३९ हजार ३६१ इतके नवे बाधित आढळले तर ४१६ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली होती तर कालच्या तुलनेत आज मंगळवारी देशात बाधितांचा आकडा तब्बल ९ हजारांनी घसरला आहे. गेल्या २४ तासात देशामध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावादरम्यान, २९ हजार ६८९ नव्या बाधितांचे निदान करण्यात आले तर ४१५ जणांना आपला जीव दिवसभरात कोरोनामुळे गमवावा लागला आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *