September 27, 2021

दोन सख्या भावांचा बुडून मृत्यू !

दोन सख्या भावांचा बुडून मृत्यू !

केज – शेतातील शेततळ्यात बुडून दोन सख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील लाडेवडगावं येथे घडली .या घटनेमुळे लाड कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे .

लाडेवडगावं येथील माधव लाड यांची दोन मुले हर्षद आणि उमेद हे दोघे वडिलांच्या मागेमागे शेतात गेले होते,यावेळी पाय घसरून हे दोघेही शेततळ्यात पडले,वडील माधव लाड यांना पोहता येत नसल्याने दुसरे कोणी मदतीला येईपर्यंत या दोन चिमुकल्या भावांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला .

या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे .अवघ्या पाच आणि सात वर्षे वयाच्या उमेद आणि हर्षद यांच्या मृत्यूने लाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे .या प्रकरणी युसूफ वडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *