बीड – शहरातील दीप हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करणाऱ्या सोनाली अंकुश जाधव या महिलेचा झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे .पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून हा नेमका काय प्रकार आहे याबाबत तपास सुरू आहे .
शहरातील पालवन चौक भागात राहणाऱ्या सोनाली जाधव या महिलेचा मृतदेह पालिजवळ एका झाडाला लटकलेला आढळून आला .सदरील महिला दीप हॉस्पिटलमध्ये काम करत होती,दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली .
घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही .