बीड – जिल्ह्यातील 3597 रुग्णांची तपासणी केली असता त्यात 170 पॉझिटिव्ह आढळून आले असून 3427 रुग्ण निगेटिव्ह आहेत .जिल्ह्यातील आष्टी,बीड,धारूर आणि पाटोदा तालुक्यातील रुग्णसंख्येचा आकडा वाढत असल्याने जिल्ह्याची चिंता वाढत आहे .
जिल्ह्यातील अंबाजोगाई 6,आष्टी 58,बीड 39,धारूर 21,गेवराई 4,केज 6 माजलगाव 5,पाटोदा 20,शिरूर 7 आणि वडवणी मध्ये 4 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत .
बीड जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून रुग्णसंख्येचा आलेख वाढता आहे .दररोज किमान दिडशे ते दोनशे रुग्ण पॉझिटिव्ह आढळून येत आहेत .राज्यातील रुग्णसंख्या कमी होत असताना मराठवाड्यात बीड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यातील संख्या लक्षणीय आहे,त्यामुळे या जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येत आहे .