April 1, 2023

परळीत मेगा विकास कामांचा शुभारंभ !यात्री निवास,रस्ते आणि 33 केव्ही चे भूमिपूजन !!

परळीत मेगा विकास कामांचा शुभारंभ !यात्री निवास,रस्ते आणि 33 केव्ही चे भूमिपूजन !!

परळी – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात परळी मतदारसंघात विकासपर्व सुरू असून, तीर्थक्षेत्र विकास योजनेतून वैद्यनाथ मंदिर परिसरातील यात्री (भक्त) निवासच्या भव्य इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन ना. मुंडेंच्या हस्ते उद्या गुरुवारी दि. 22 रोजी करण्यात येत आहे. त्याच बरोबर व्ही.आय.पी. सर्किट हाऊस परिसरात उभारण्यात येणाऱ्या नवीन 33 केव्ही सबस्टेशनच्या उभारणी कामाचे व परळी शहरातील दोन महत्त्वाच्या सिमेंट रस्त्याच्या कामांचे देखील यावेळी ना. मुंडेंच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येणार आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषणा केल्याप्रमाणे परळीतील वैद्यनाथ मंदिर परिसरात जुन्या तहसीलच्या जागी भव्य यात्री निवास उभारण्यात येणार आहे. सायंकाळी 5.45 वा. होणाऱ्या या भूमिपूजन समारंभास ना. मुंडे यांच्या सह आ. संजय दौंड, नगराध्यक्षा सौ. सरोजिनिताई हलगे, वैद्यनाथ मंदिर समितीचे सचिव राजेश देशमुख यांच्यासह सर्व विश्वस्त, पदाधिकारी तसेच नगर परिषदेचे सर्व सभापती, पदाधिकारी, नगरसेवक व अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

नवीन 33 kv चे भूमिपूजन

त्याचबरोबर सर्किट हाऊस परिसरात 33 केव्ही सबस्टेशन उभारल्यामुळे मुख्य विद्युत वाहिनीवरील ताण कमी होऊन विजेचा लपंडाव बंद होण्यास मोठी मदत मिळणार आहे. या कामाचे सर्किट हाऊस परिसरात सायंकाळी 5.15 वा. भूमिपूजन करण्यात येणार असून, या समारंभास ना. मुंडे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार, सर्व प्रमुख लोकप्रतिनिधी तसेच महावितरणचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

2 महत्वाच्या रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ

परळी शहरातील संत भगवानबाबा चौक ते तहसील कार्यालय व दोस्ती टी हाऊस ते अग्रवाल आईस फॅक्टरी या दोन महत्वाच्या रस्त्याच्या कामांचेही ना. मुंडेंच्या हस्ते उद्या सायंकाळी 5.15 वा. भूमीपूजन संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास ना. धनंजय मुंडे, आ. संजय दौड, यांच्या सह नगराध्यक्षा सौ. सरोजनीताई हालगे, गटनेते वाल्मिकअण्णा कराड , सर्व सभापती, पदाधिकारी आदी उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमास नागरिकांनी करोना नियमांचे पालन करत उपस्थित रहावे असे आवाहन नगरपालिकेच्या वतीने तसेच महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click