May 28, 2022

मंगळवारी 211 पॉझिटिव्ह, शिरूर तालुक्याच्या वेळेत कपात !!

मंगळवारी 211 पॉझिटिव्ह, शिरूर तालुक्याच्या वेळेत कपात !!

बीड – बीड जिल्ह्यात आज दि 20 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 3579 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 211 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3368 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे,शिरूर तालुक्यातील रुग्णसंख्येत मोठी वाढ होत असल्याने या तालुक्यातील व्यवहार सकाळी सात ते साडेबारा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत .

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 10 आष्टी 43 बीड 36 धारूर 5 गेवराई 14 केज 10 माजलगाव 5 परळी 1 पाटोदा 28 शिरूर 42 वडवणी 17 असे रुग्ण आढळून आले आहेत

 1. बीड जिल्हयातील शिरुर कासार या तालुक्यामध्ये ग्रामीण व शहरी भागात आवश्यक सेवांच्या पुरवठा संबधित आस्थापना उघडण्याचा कालावधी प्रत्येक दिवशी सोमवार ते रविवार सकाळी 07.00 ते दुपारी 12.30 वा. पर्यंत असेल.
 2. बीड जिल्हयातील शिरुर कासार या तालुक्यामध्ये ग्रामीण व शहरी भागात सोमवार ते शुक्रवार आवश्यक सेवे व्यतिरिक्त इतर आस्थापना उघडण्याचा कालावधी (सोमवार ते शुक्रवार) सकाळी 07.00 ते दुपारी 12.30 वा. पर्यंत असेल. शनिवार व रविवार या दिवशी आवश्यक सेवांच्या
 3. पुरवठा संबधित आस्थापना वगळता इतर सर्व आस्थापना पुर्ण पणे बंद राहतील.
 4. वरील तालुक्यामधील सर्व आस्थापनां पैकी जसे की, हॉटेल, रेस्टॉरंट, ई-कॉमर्स सेवा, व्यायामशाळा, सलून, ब्युटी पार्लर इ. आस्थापनाधारकांना या कार्यालयाचे आदेश क्र.2021/आरबीडेस्क-1/पोल-1/कावि-
  फौप्रसंक144 दिनांक 05.06.2021 मधील नमुद निबंध वरील कालावधीमध्ये लागु राहतील.
 5. शिरुर कासार या तालुक्यामध्ये सकाळी 07.00 वा. ते दुपारी 12.30. वाजेपर्यंतची आस्थापना सुरु ठेवण्याची सुधारित वेळ लक्षात घेता, दुपारी 01.00 वाजेनंतर केवळ अत्यावश्क कारणांव्यतिरिक्त (उदा. परगावी प्रवास, वैद्यकीय सेवा इ.) हालचाल व शहरातंर्गत अथवा गावांतर्गत प्रवासास परवानगी असणार नाही.
 6. उक्त वेळे व्यतिरिक्त विना कारण घराबाहेर पडल्याचे निर्दशनास आल्यास, संबधिता विरुध्द आपत्ती व्यपस्थापन कायद्यांतर्गत कार्यवाही अनुसरण्यात येईल.
 7. संबधित कायक्षेत्रातील उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, उप विभागीय पोलीस अधिकारी, मुख्याधिकारी
  नगर पालिका / नगर पंचायत, पोलीस निरिक्षक, स्थानिक पोलीस स्टेशन, यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात सदरील आदेशाची अंमलबजावणी काटेकोर पणे पुर्ण करावी.
 8. शहरांमधील विशिष्ट ठिकाणी अथवा विशिष्ट गाव / वाडी ठिकाणी मोठया प्रमाणावर रुग्ण संख्या वाढत असल्याचे निर्दशनास आल्यास अशी शहरी भागांमधील ठिकाणे | गावे | वाडी कंटेन्मेंट झोन (Containment Zone) घोषित करण्याबाबतची दक्षता स्थानिक अधिकारी यांनी घ्यावी तसेच (Containment Zone) ची अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने स्थानिक कर्मचारी यांनी कार्य करावे, क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी वेळोवेळी याबाबत स्थळ पाहणी करावी.
 9. सद्यस्थितीत जिल्हयात कोवीड-19 बाधित असलेल्या रुग्णांकरिता गृह विलगीकरण (Home Isolation) ची परवानगी पुर्णत: बंद असल्याने ज्या स्थानिक अधिकाऱ्यांच्या/ कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात कोविड बाधित
  रुग्ण गृह विलगीकरणात आढळुन येतील त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदीप्रमाणे कार्यवाही अनुसरण्यात येईल याची नोंद घ्यावी.
 10. बाजारपेठांमध्ये विना मास्क फिरणारे नागरिक तसेच विहित कालावधी नंतरही आस्थापना सुरु ठेवणारे व्यवसायिक यांच्यावर दंडात्मक कार्यवाही अनुसरण्यात यावी जेणेकरुन प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी काटेकोरपणे पुर्ण होईल.
 11. शनिवार व रविवार या दिवसांमध्ये आवश्यक सेवे व्यतिरिक्त इतर आस्थापना सुरु राहणार नाहीत याची दक्षता सर्व तहसिलदार यांनी घ्यावी या करिता कार्यक्षेत्रातील उप विभागीय पोलीस अधिकारी, मुख्याधिकारी, नगर पालिका | नगर पंचायत व गट विकास अधिकारी यांच्या सोबत
  दररोज आढावा घ्यावा आणि सर्व तहसिलदार यांनी याबाबत सर्व संबधित विभागासोबत समन्वय ठेवुन कामकाज करावे. दंडात्मक कार्यवाही प्राधान्याने आणि परिणामकारक असावी.
 12. निबंधाचा कालावधी लक्षात घेता, नियंत्रक अधिकारी यांनी शेती विषयक कामे व पीक कर्ज विषयक कामे बाधित होणार नाहीत याबाबत दक्षता घेवुन विवेकाने परिस्थितीवर नियंत्रण ठेवावे.
 13. सदर आदेशानुसार करण्यात आलेले बदल हे औद्योगिक क्षेत्रास प्रभावित करणार नाहीत. उद्योगांना यापुर्वीच्या वेळोवेळी निर्गमित आदेशांमधील नियम व निबंध पुर्वीप्रमाणे लागू राहतील.
 14. जिल्हयातील इतर तालुक्यांमधील क्षेत्रीय अधिकारी यांनी देखील सद्यस्थितीत त्यांच्या तालुक्यांमध्ये रुग्ण संख्या आटोक्यात असली तरी, गाफिल न राहता या कार्यालयाचे वेळोवेळी प्रदान करण्यात आलेल्या आदेशांचे काटेकोरपणे पालन करावे,असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click