बीड – जिल्ह्यातील आष्टी आणि बीड या दोन तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा पन्नास पेक्षा अधिक असल्याने बीड जिल्ह्यातील रुग्णसंख्येचा आलेख 113 वर जाऊन पोहचला .मात्र गेल्या काही दिवसात दिडशे दोनशेच्या घरात असलेल्या आकड्यापेक्षा हा आकडा दिलासादायक आहे हे नक्की .
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई 5,आष्टी 25,बीड 28,धारूर 4,गेवराई 6,केज 7,माजलगाव 10,पाटोदा 12,शिरूर 10 आणि वडवणी मध्ये 6 रुग्ण आढळून आले आहेत .
जिल्ह्यातील 4531 रुग्णांची तपासणी केली असता त्यात 113 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत .विशेष म्हणजे गेल्या महिनाभरापासून एखाद्या दिवसाचा अपवाद वगळता दररोज किमान 150 ते 175 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून येत आहेत .
मात्र सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालात हा आकडा काहीसा कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे,परंतु नागरिकांनी काही दिवस काळजी घेणे गरजेचे आहे .