बीड – आपल्या नेत्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फुटकळ कार्यक्रम घेऊन मोठं मोठे डिजिटल लावून चमकोगिरी करणाऱ्यांपेक्षा विधायक काम करण्याच्या दृष्टीने आ संदिप क्षीरसागर यांनी बीड मध्ये मोफत अँजियोग्राफी आणि अँजियोप्लास्टी तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे .गरजू रुग्णांनी काकू नाना हॉस्पिटलमध्ये संपर्क साधावा असे आवाहन आ क्षीरसागर यांनी केले आहे .
राजकीय क्षेत्रातील आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी शहरात,जिल्ह्यात मोठं मोठे होर्डिंग, बॅनर लावून शहराचे विद्रुपीकरण करण्याची स्पर्धा लागल्याचे सध्या सगळीकडे दिसून येते .मात्र बीडचे आ संदिप क्षीरसागर या गोष्टीला अपवाद ठरले आहेत .
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आ क्षीरसागर यांनी बीड मतदारसंघातील जनतेसाठी मोफत अँजियोग्राफी आणि अँजियोप्लास्टी तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे .मोठं मोठ्या रुग्णालयात या तपासणीसाठी हजारो रुपये खर्च येतो,मात्र या उपक्रमामुळे आता हा खर्च वाचणार आहे .
अँजीओग्राफी,अँजीओप्लास्टी मोफत तपासणी करण्यासाठी आजच नाव नोंदणी कराराज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने हृदयरोग रूग्णांसाठी अँजीओग्राफी, अँजीओप्लास्टी मोफत तपासणी करण्यासाठी काकू-नाना मेमोरीयल हॉस्पिटल व मोतीरामजी वरपे कार्डियाक युनिट बीड येथे ज्ञानेश कुलकणी मो. 9066367777, विष्णु चोले मो.7218734243 यांच्याकडे आजच आपली नाव नोंदणी करा असे आवाहन काकू-नाना मेमोरीयल रूग्णालय प्रशासनाच्या करण्यात आले आहे.