बीड – राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा कमी होत असला तरी बीड जिल्ह्यात मात्र रुग्णसंख्येचा रोजचा आकडा दिडशे ते दोनशे च्या घरात आहे .प्रशासनाने दुपारी चार नंतर मार्केट बंदचे आदेश दिले आहेत,मात्र त्यानंतरही मार्केट सुरूच असते पण लोक सुद्धा रात्री उशिरा पर्यंत बाहेर फिरत आहेत .एवढच काय पर्यटन स्थळे देखील फुल आहेत,याला आवर घालायला हवा नाहीतर पुन्हा लॉक डाऊन होण्याची शक्यता नाकारता येत नाही .
बीड जिल्ह्यातील कोरोनाच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या लक्षात घेतल्यास पोलीस आणि महसूल प्रशासन कुचकामी ठरत असल्याचे दिसून येते .गेल्या महिना दीड महिन्यापासून बीड जिल्ह्यात दररोज किमान 150 ते 175 रुग्ण सापडत आहेत .
एकीकडे जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट कमी होण्याच नाव घेत नसताना दुसरीकडर लोक मात्र सगळे नियम धाब्यावर बसवून मोकार फिरत आहेत .जिल्हाधिकारी किंवा एसपी यांनी स्वतः रस्त्यावर उतरून पाहिले तर लक्षात येईल.
बीड शहरातील मोमीनपुरा,खासबाग,शहेनशहा नगर,बार्शी नाका,शाहूनगर,अंबिका चौक,कटकटपुरा बालेपिर या भागात रात्री उशिरापर्यंत सगळी दुकाने सुरू असतात .हेच चित्र इतर तालुक्यात सुद्धा आहे .काही मोठं मोठे दुकानदार शनिवार आणि रविवारी सुद्धा दुकानाबाहेर नोकरांना बसवून मागच्या दाराने किंवा एक शटर उघडे ठेवून धंदा करून कोरोनाला आमंत्रण देत आहेत .
बीड जिल्ह्यातील कपिलधार, सौताडा,वेगवेगळ्या डोंगर,टेकड्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करत आहेत,मात्र त्यांना रोखणार कोणीच नाही अशी परिस्थिती आहे .एकीकडे छोटे व्यावसायिक नियम पाळून चार वाजताच दुकाने बंद करत असताना मोठे दुकानदार मात्र चोरी छुपे धंदे करत आहेत .
बीडचे जिल्हाधिकारी, एसपी यांनी चार नंतर लोकांना रस्त्यावर फिरण्यास मनाई केली आहे,मात्र हे आदेश केवळ कागदावर असल्याचे चित्र आहे.लोक रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर मोकार फिरत आहेत,कोणाच्याही तोंडाला मास्क नाही,नियम सर्रास पायदळी तुडवले जात आहेत .
चौकात जे पोलीस असायला हवेत ते केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे.जिल्हा अंडी पोलीस प्रशासनाने जे लोक मोकार रस्त्यावर फिरतात त्यांना जागेवर दंड करून तसेच त्यांची आर्टिपीसीआर केल्यास रस्त्यावर फिरणाऱ्यांची गर्दी कमी होईल हर नक्की .