बीड – बीड जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा दररोज वाढत आहे .किमान दिडशे ते पावणे दोनशे रुग्ण रोज पॉझिटिव्ह आढळून येत आहेत .आष्टी ,पाटोदा,शिरूर या तीन तालुक्यातील रुग्णसंख्या कमी होत नसल्याने जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट देखील कमी होत नसल्याचे दिसून येत आहे .
आज दुपारी आरोग्य विभागाकडून 4954 अहवालचा रिपोर्ट प्राप्त झाला यात 4780 अहवाल निगेटिव्ह आले तर 174 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले.
बीड जिल्ह्यातील आष्टी 52, बीड 26, धारुर 4, गेवराई 12, केज 11, पाटोदा 20, शिरुर 32, वडवणी 10, माजलगाव 07 असे एकूण 174 रुग्णांची भर जिल्ह्यात पडली.
राज्याचा रिकव्हरी रेट देखील गेल्या दोन दिवसात वाढत आहे,सांगली,कोल्हापूर,बीड,उस्मानाबाद सारख्या जिल्ह्यातील रुग्ण वाढत असल्याने राज्याची आकडेवारी वाढत आहे .नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे,मात्र लोक बिनधास्त विनामास्क फिरत असल्याने रुग्णसंख्येला आळा बसत नसल्याने आरोग्य प्रशासनावर ताण वाढत आहे .