बीड – राज्यातील कोरोनाचा आकडा कमी होत असताना बीड जिल्ह्यात मात्र दररोज हा आकडा वाढतच आहे .जिल्ह्यात शनिवारी प्राप्त झालेल्या अहवालात तब्बल 181 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले .यात आष्टी,बीड,शिरूर आणि वडवणी मध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत .
बीड जिल्ह्यातील 4818 रुग्णांची तपासणी केली असता 4637 रुग्ण निगेटिव्ह तर 181 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .
जिल्ह्यातील अंबाजोगाई 8,आष्टी 52,बीड 26,धारूर 7,गेवराई 16,केज 15,माजलगाव 8,पाटोदा 16,शिरूर 16 आणि वडवणी मध्ये 17 रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आले आहेत .
राज्यातील काही ठराविक जिल्हे वगळता इतर भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे,मात्र मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात काही जिल्ह्यात हा आकडा कमी होत नसल्याचे चित्र आहे .त्यामुळेच राज्य सरकारने लॉक डाऊन च्या निर्बंधात कोणताही बदल केलेला नाही .