बीड – प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत सन 2021-22 मध्ये खरीप हंगामासाठी पिक विमा प्रस्ताव स्विकारणे सुरु असून पिक विमा भरण्याचा अंतिम मुदत आता शुक्रवार 23 जुलै पर्यंत वाढविली आहे. पिक विमा योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी तात्काळ पिक विम्याची नोंदणी करावी असे आवाहन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहेत.
यापूर्वी पिक विमा भरण्याचा अंतिम मुदत 15 जुलै दिली होती.तथापि महाराष्ट्र शासनाने भारत सरकारच्या कृषि मंत्रालयाला एवढ्या अल्पमुदतीत शेतकऱ्यांना पिक विमा काढणे कठीण असल्याचे निदर्शनास आणून यात मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. कोविड-19 ची परिस्थिती आणि शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन ही मुदतवाढ करीत असल्याचे भारत सरकारच्या कृषि मंत्रालयाचे सहाय्यक आयुक्त सुनिलकुमार यांचे आदेश प्राप्त झाले आहेत.