बीड – जिल्ह्यातील 5237 रुग्णांची तपासणी केली असता त्यात तब्बल 196 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .तर 5041 रुग्ण निगेटिव्ह आहेत .आष्टी,पाटोदा,गेवराई आणि केज तालुक्यातील रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे .
जिल्ह्यातील अंबाजोगाई 8,आष्टी 46,बीड 45,धारूर 8,गेवराई 27,केज 10,माजलगाव 8,परळी 2,पाटोदा 21,शिरूर 12 आणि वडवणी मध्ये 9 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .
राज्यात मागील 24 तासांत 7,243 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 61,72,645 झाली आहे. राज्यात एकूण 1,04,406 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. 196 रुग्ण दगावले. त्यांपैकी 167 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 29 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. मृतांचा एकूण आकडा 1,26,220 वर पोहोचला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,43,83,113 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 61,72,645 (13.91 %) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,74,463 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,607 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.