बीड – जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे .जिल्ह्यातील ४०८१ रुग्णांची तपासणी केली असता त्यात 175 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .
जिल्ह्यातील अंबाजोगाई २,आष्टी २८,बीड ४६,धारूर ३,गेवराई ३६,केज १२,माजलगाव ६,परळी १,पाटोदा २०,शिरूर १५ वडवणी मध्ये ६ रुग्ण आढळून आले आहेत
देशाचा आठवड्याचा आणि दिवसाचा पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्केंपेक्षा कमी आहे. भारताचा आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट 2.28 टक्के इतका आहे. तर दिवसाचा पॉझिटिव्हिटी रेट 1.81 टक्के इतका आहे. मागील 22 दिवसांपासून भारताचा दिवसाचा पॉझिटिव्हिटी रेट तीन टक्केंपेक्षा कमी आहे.
मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत 38 कोटी 14 लाख 67 हजार 646 कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. मागील 24 तासांत देशात 40 लाख 65 हजार 862 डोस देण्यात आले आहेत. 18 ते 44 वयोगटातील जवळपास 12 कोटी लोंकाचं लसीकरण झालं आहे.
मागील चोवीस तासांत राज्यात ७,६०३ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर १५,२७७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. नव्या रुग्णांपेक्षा दुप्पट रुग्ण बरे झाल्यानं राज्यासाठी सोमवार दिलासादायक ठरला. तसेच दिवसभरात ५३ रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे राज्यात एकूण ६१,६५,४०२ रुग्ण आढळून आले तर आजवर ५९,२७,७५६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच राज्यात आजवर १,२६,०२४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, राज्यात सध्या १,०८,३४३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 96.15 % झाले आहे.