बीड जिल्ह्यात आज दि 12 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 3484 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 174 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3310 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 1 आष्टी 70 बीड 31 धारूर 10 गेवराई 15 केज 12 माजलगाव 1 पाटोदा 25 शिरूर 4 वडवणी 5 असे रुग्ण आढळून आले आहेत
राज्यात आज ८,५३५ नव्या रुग्णांचे निदान
मुंबई: राज्यात गेल्या २४ तासात एकूण ८ हजार ५३५ नव्या करोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच आज नव्या रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या काहीशी घटली आहे. आज एकूण ६ हजार ०१३ इतके रुग्ण बरे झाले आहेत. तसेच, आज एकूण १५६ रुग्णांनी प्राण गमावेल आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
आजच्या १५६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर २.०४ टक्क्यांवर सरकला आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ५९ लाख १२ हजार ४७९ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.०२ टक्के एवढे झाले आहे.
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख १६ हजार १६५ इतकी झाली आहे.
देश सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. सध्या रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. त्यामुळे देशवासियांना थोडा दिलासा मिळाला आहे. आरोग्य मंत्रालयाने नुकतीच गेल्या २४ तासातली आकडेवारी जाहीर केली आहे. यावरुन हे लक्षात येत आहे की देशातल्या करोना रुग्ण बरे होण्याच्या दरात वाढ झाली आहे.