बीड – जिल्ह्यातील 3915 रुग्णांची तपासणी केली असता त्यात 157 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर 3758 रुग्ण निगेटिव्ह आहेत .बीड आणि आष्टी तालुक्यातील रुग्णसंख्या लक्षणीय आहे .जिल्ह्यातील रुग्ण वाढत असताना देशातील आणि राज्यातील संख्या मात्र काहीशी घटली आहे .
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई 6,आष्टी 33,बीड 34,धारूर 5,गेवराई 23,केज 14,माजलगाव 2,परळी 3,पाटोदा 20,शिरूर 7 आणि वडवणी मध्ये 10 रुग्ण आढळून आले आहेत .
मागील 24 तासांत देशात 41 हजार 506 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. याच कालावधीत देशात 41 हजार 526 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 895 जणांचा मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसांपासून देशातील कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या कमी-जास्त होत आहे. 35 हजारांखाली आलेली नवीन कोरोना रुग्णसंख्या पुन्हा 45 हजारांच्या पुढे गेली होती. आता यामध्ये पुन्हा एकदा थोड्याप्रमाणात घट पाहायला मिळत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील तीन दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येमध्ये थोड्या प्रमाणात घट पाहायला मिळत आहे.
राज्यात शनिवारी 8,296 कोरोनाबाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 6,026 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 59,06,466 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1,14,000 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 96.05% झाले आहे. दरम्यान, महाराष्ट्रात शनिवारपर्यंत 3 कोटी 59 लाख 75 हजार 367 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. दि. 9 जुलै 2021 रोजी 1,97,208 लाभार्थ्यांचं लसीकरण करण्यात आले.