बीड – बीड जिल्ह्यात आज दि 10 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4085 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 188 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3897 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण जिल्ह्यात अंबाजोगाई 6 आष्टी 81 बीड 30 धारूर 6 गेवराई 21 केज 15 माजलगाव 2 पाटोदा 17 शिरूर 5 वडवणी 5 असे रुग्ण आढळून आले आहेत
जिल्ह्यातील रुग्णसंख्या गेल्या दोन तीन दिवसात मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे चित्र आहे .विशेषतः आष्टी तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्ण अधिक आढळून येत आहेत, त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे .