July 28, 2021

नारायण राणे,कपिल पाटील,भागवत कराड ,भारती पवार यांच्यासह 43 मंत्र्यांचा शपथविधी !

नारायण राणे,कपिल पाटील,भागवत कराड ,भारती पवार यांच्यासह 43 मंत्र्यांचा शपथविधी !

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार सायंकाळी पार पडला,एकूण 43 मंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली .यामध्ये महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून तर भागवत कराड,भारती पवार आणि कपिल पाटील यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली .

आज सायंकाळी 6 वाजता राष्ट्रपती भवनात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात 43 मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली. 43 मंत्र्यांच्या यादीत नारायण राणे यांचं नाव सर्वात वर होतं. त्यामुळे त्यांनी पहिली शपथ घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह सर्वच केंद्रीय मंत्री उपस्थित होते

नारायण राणे,सर्बानंद सोनोवाल,डॉ. विरेंद्र कुमार,ज्योतिरादित्य सिंधिया,रामचंद्र प्रसाद सिंग,अश्विनी वैष्णव,पशुपती कुमार पारस,किरेन रिजीजू,राजकुमार सिंह,हरदीप सिंह पुरी,मनसुख मंडाविया,भुपेन्द्र यादव,पुरुषोत्तम रुपाला,जी. किशन रेड्डी,अनुराग सिंह ठाकूर यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून तर अनुप्रिया सिंह पटेल,डॉ. सत्यपाल सिंह बघेल,राजीव चंद्रशेखर,शोभा करंडलाजे,भानूप्रताप सिंग वर्मा,दर्शना विक्रम जरदोष,मीनाक्षी लेखी,अनपुर्णा देवी,ए. नारायण स्वामी,कौशल किशोर,अजय भट्ट,बी. एल. वर्मा,अजय कुमार,चौहान देवूसिंह,भागवत खुपा,कपिल पाटील,प्रतिमा भौमिक,डॉ. सुभाष सरकार,डॉ. भागवत कराड,डॉ. राजकुमार सिंह,डॉ. भारती पवार,बिस्वेश्वर तडू,शंतनु ठाकूर,डॉ. मुंजपारा महेंद्रभाई,जॉन बरला,डॉ. एल. मुरगन,निसित प्रमाणिक यांनी शपथ घेतली .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *