नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्म मधील पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज सांयकाळी सहा वाजता होत आहे .यामध्ये देशातील 25 राज्यातील प्रमुख नेत्यांना संधी देण्यात आली असून डॉक्टर, इंजिनिअर,प्रशासकीय अधिकारी यांचा समावेश आहे .तब्बल 43 खासदार आज मंत्रिपदाची शपथ घेतील.
भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील सत्तेला आता सात वर्षपूर्ण झाली आहेत .नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर हा पहिलाच मंत्रिमंडळ विस्तार आहे .काही जेष्ठ मंत्र्यांचे अकाली निधन झाल्याने तसेच काही सहकारी मित्रपक्षाने एनडीए ची साथ सोडल्याने रिक्त झालेल्या जागा भरल्या जाणार आहेत .
या मंत्रिमंडळ विस्तारात मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, महाराष्ट्र या राज्यांना अधिकचे प्रतिनिधित्व देण्यात आले आहे .महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री नारायण राणे,खा कपिल पाटील,खा हिना गावित आणि खा भागवत कराड यांचे नाव फायनल झाले आहे .विद्यमान मंत्री रमेश पोखरियाल निशंक ,देबश्री चौधरी,सदानंद गौडा, थावरचंद गहलोत,संतोष गंगवार यांना दिच्चू देण्यात आला आहे .
मोदींच्या कॅबिनेट मध्ये या विस्तारामुळे तब्बल 30 पेक्षा अधिक ओबीसी मंत्री होणार आहेत,तसेच एससी एस टी वर्गाला देखील मोठे प्रतिनिधित्व दिले गेले आहे .मराठा,जाट, ब्राम्हण वर्गाला सुद्धा यात संधी दिली आहे .या मंत्रिमंडळात 13 वकील,6 डॉक्टर,7 इंजिनिअर यांचा समावेश आहे .