March 31, 2023

डेल्टामुळे तिसरी लाट येण्याची भीती !

डेल्टामुळे तिसरी लाट येण्याची भीती !

नवी दिल्ली – गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचा मुकाबला करणाऱ्या भारतीयांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे .करोनाचा डेल्टा व्हेरिएंटमुळे देशात तीसरी लाट येणार असल्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर एका अभ्यासात चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे.

अभ्यासामध्ये असे म्हटले आहे की, लशीवर केलेल्या अभ्यासानुसार, करोना लशीमुळे निर्माण होणाऱ्या अँटिबॉडीजचा डेल्टा व्हेरिएंटवर ८ पट कमी परिणाम होतो. तसेच यामुळे श्वसन यंत्रणेत अधिक गंभीर संक्रमणही होते. याव्यतिरिक्त, त्याची संसर्गजन्य क्षमता देखील खूप जास्त आहे.

अभ्यासानुसार, डेल्टा व्हेरिएंट तुलनेत वुहानच्या स्ट्रेनपेक्षा अधिक लोकांपर्यंत पसरण्याची भीती आहे. करोना लस घेतलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये B.1.1.7 आणि B.1.617.1 कप्पा व्हेरिएंटपेक्षाही डेल्टा प्लस जास्त पसरत आहे.

यापुर्वी दिल्लीमधल्या एका वैद्यकीय संस्थेतल्या आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत देखील हा अभ्यास करण्यात आला. या संस्थेतल्या १८८ कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाला १६ जानेवारी रोजी सुरुवात झाली होती. एप्रिलच्या शेवटापर्यंत जवळपास १६०० जणांचं लसीकरण पूर्ण झालं. या रुग्णालयाने सांगितलं की, लस घेतल्यानंतरही १०टक्के कर्मचाऱ्यांना करोना झाला. विषाणूच्या अधिक काळ संपर्कात असल्याने डॉक्टर आणि नर्स तसंच इतर कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर संसर्ग झाल्याची शक्यता आहे.

या कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेतल्यानंतर हे लक्षात आलं की ७० टक्के लोकांना डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग झाला आहे. लस घेतल्यानंतरही या विषाणूचा संसर्ग होणं ही काळजीची बाब असल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. या संस्थेचे अध्यक्ष डॉ. सरीन म्हणतात की, लसीमुळे प्रतिपिंडे तयार झाली असली तरी सध्या देण्यात येणाऱ्या लसी या नव्या डेल्टा व्हेरिएंटविरोधात पुरेसं संरक्षण देऊ शकणार नाहीत. त्यामुळे लस घेतल्यानंतरही दोन मास्क वापरणं अनिवार्य आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click