October 4, 2022

दहावी बारावीच्या मूल्यांकणाचा फॉर्म्युला ठरला !

दहावी बारावीच्या मूल्यांकणाचा फॉर्म्युला ठरला !

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यांकनाधारे गुण देण्याचा फार्म्युला शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केला आहे .त्यानुसार दहावी,अकरावी चे 30 / 30 गुण अन बारावीचे 40 गुण असे मूल्यांकन केले जाईल अशी माहिती गायकवाड यांनी दिली .

इयत्ता दहावी मधील बोर्डाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवलेल्या तीन विषयांचे सरासरी गुण यावर आधारित 30 टक्के गुण ग्राह्य धरले जातील.तर दुसरीकडे अकरावी परीक्षेच्या वार्षिक मूल्यमापन आतील विषयनिहाय गुण याचा 30 टक्के विचार केला जाईल इयत्ता बारावी वर्षभरात अंतर्गत मूल्यमापन आतील प्रथम सत्र परिक्षा सराव परीक्षा सराव चाचण्या तसेच मूल्यमापन यातील विषयनिहाय गुण 40 टक्के ग्राह्य धरले जाणार आहेत.

शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12वी. परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचे इयत्ता 10वी आणि इयत्ता 11वी या दोन्ही इयत्तांसाठी संपादणूकीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करुन वार्षिक निकाल जाहीर करण्यात आलेले आहेत.

कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये राज्यातील विविध भागातील उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालये या स्थानिक परिस्थितीमुळे एकाचवेळी सुरू होऊ शकल्या नाहीत. तसेच राज्यातील सर्व उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांत 12वी च्या मूल्यमापन प्रकियेतील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यापैकी सर्वच परीक्षा घेण्यात आल्या आहेत असे नाही. त्यामुळे 12वी परीक्षा सन 2021 साठी प्रविष्ट विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करताना लेखी, तोंडी / प्रत्यक्षिक / अंतर्गत मूल्यपापन यासाठी निर्धारित केलेले गुण कायम ठेवण्यात यावेत.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click