बीड – जिल्ह्यातील तब्बल 3858 रुग्णांची तपासणी केली असता त्यात 103 पॉझिटिव्ह तर 3755 निगेटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत .रुग्णसंख्या आटोक्यात आल्याचे दिसत असले तरी पॉझिटिव्हीटी रेट कमी झालेला नाही .
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई 4,आष्टी 21,बीड 11,धारूर 11,गेवराई 15,केज 7,माजलगाव 6,परळी 2,पाटोदा 17,शिरूर 4 आणि वडवणीला 5 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत .
बीड जिल्ह्यात गेल्या महिनाभरपसून रुग्णसंख्या आटोक्यात आल्याचे चित्र असले तरी पॉझिटिव्हीटी रेट कमी होताना दिसत नाहीये .त्यामुळे नागरिकांनी आणखी काही दिवस काळजी घेणे गरजेचे आहे .