July 28, 2021

ग्राहक मंचचा एसबीआय ला दणका ! डॉ बारकुल यांना सात हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश !!

ग्राहक मंचचा एसबीआय ला दणका ! डॉ बारकुल यांना सात हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश !!

बीड – विहित मुदतीत चेक क्लियरिंग साठी दिल्यानंतरही चेक क्लियर न करता अनादर केल्याप्रकरणी एसबीआय बँकेला ग्राहक मंचने सात हजार रुपये दंड केला आहे .तक्रारदार डॉ अनिल बारकुल यांना झालेल्या मानसिक आणि शारीरिक त्रासापोटी ही रक्कम तातडीने त्यांना देण्याचे आदेश मंचने दिले आहेत .

बीड येथील नावाजलेले फिजिशियन डॉ अनिल बारकुल यांनी 28 जून 2016,20 सप्टेंबर 2017 आणि 8 ऑक्टोबर 2018 रोजी तीन चेक एसबीआय ला जमा केले .हे चेक विहित मुदतीत जमा केले,मात्र तरीही ते जमा झाले नाहीत अन रक्कम खात्यावर प्राप्त झाली नाही .

याबाबत डॉ बारकुल यांनी वारंवार बँकेशी संपर्क केला मात्र त्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही .अखेर डॉ बारकुल यांनी ग्राहक मंचात धाव घेतली .या प्रकरणी सुनावणी अंती ग्राहकमंचने एसबीआय बँकेला सात हजार रुपये डॉ बारकुल यांना देण्याचे आदेश दिले .शारीरिक आणि मानसिक त्रासापोटी पाच हजार अन तक्रारीचा खर्च म्हणून दोन हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत .

देशभरात नेटवर्क असलेल्या एसबीआय चा भोंगळ कारभार यामुळे पुन्हा एकदा समोर आला आहे .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *