July 28, 2021

पंकजा मुंडे यांचा कोणावर निशाणा !!

पंकजा मुंडे यांचा कोणावर निशाणा !!

बीड – भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा माजीमंत्री पंकजा मुंडे यांच्या एका फेसबुक पोस्टमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे,मराठा आरक्षणाच्या विषयावरून स्वतःच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढणारे भाजपचे आ सुरेश धस यांना या माध्यमातून त्यांनी टोला लगावल्याची चर्चा आहे .

जीस दिये को तुफानो में बुझने से बचाया ,वही दिया हाथ जला रहा है !! अस म्हणत पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे .

चार दिवसांपूर्वी भाजपचे आ सुरेश धस यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता .या मोर्चात पंकजा मुंडे, खा प्रीतम मुंडे यांच्यासह जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के,केजच्या आ नमिता मुंदडा ,रमेश आडसकर अशा अनेकांची गैरहजेरी होती .

सुरेश धस यांनी कोणालाही न विचारता ऐनवेळी हा मोर्चा काढला अशी चर्चा भाजपच्या गोटात सुरू होती,त्यातच आता स्वतः पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट केल्याने खळबळ उडाली आहे .

पंकजा मुंडे यांच्या फेसबुक पोस्टमुळे जिल्हा भाजपमध्ये सर्वकाही अलबेल नसल्याचं स्पष्ट झालं आहे .आ धस यांनी ज्या दिवशी मोर्चा काढला त्या दिवशी खा प्रीतम मुंडे या जिल्ह्यात होत्या ,मात्र त्यांनी आष्टीत जाऊन धोंडे यांच्यासोबत बैठक घेणे पसंत करत धस यांच्या मोर्चाकडे पाठ फिरवली .

ऊसतोड कामगारांना 80 टक्के वाढ मिळावी यासाठी राज्यात दौरा करून आंदोलन करणारे धस यांचे या प्रश्नावरून देखील श्रेष्टींशी खटके उडाले होते मात्र तेव्हा हा वाद बाहेर आला नव्हता .परंतु आता स्वतः पंकजा मुंडे यांनीच ही पोस्ट केल्याने हा वाद चव्हाट्यावर आला आहे .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *