January 29, 2023

आष्टीने वाढवली बीडची चिंता !बुधवारी 173 पॉझिटिव्ह !!

आष्टीने वाढवली बीडची चिंता !बुधवारी 173 पॉझिटिव्ह !!

बीड जिल्ह्यात आज दि 30 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 3979 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 173 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3806 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 8 आष्टी 52 बीड 22 धारूर 7 गेवराई 17 केज 15 माजलगाव 9 परळी 3 पाटोदा 15 शिरूर 15 वडवणी 10 असे रुग्ण आढळून आले आहेत

राज्यात गेल्या 24 तासात एकूण 8 हजार 085 नव्या कोरोना बाधित रुग्णांचे निदान

राज्यात गेल्या 24 तासात एकूण 8 हजार 085 नव्या कोरोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. तर आज एकूण 8 हजार 623 इतके रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच आज दिवसभरात 231 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यंत 1 लाख 21 हजार 804 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 2.01 टक्के आहे. तर कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 58 लाख 09 हजार 548 इतकी झाली आहे.
राज्यात सध्या 1 लाख 17 हजार 098 सक्रीय रुग्ण आहेत.

देशातील नव्या करोनाबाधितांची संख्या घटली

नवी दिल्ली – देशातील नव्या करोना रुग्णांची संख्या आता चाळीस हजारांच्याही खाली आली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या 24 तासांत करोनाचे 37 हजार 566 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

मृतांचा आकडाही एक हजाराच्या आत आला असून, देशात गेल्या 24 तासांत 907 करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशात करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या आता 3 लाख 97 हजार 637 इतकी झाली आहे.

दरम्यान, काल दिवसभरात देशात देण्यात आलेल्या नव्या करोना लस डोसमुळे लस देण्यात आलेल्या नागरिकांची एकूण संख्या आता 32 कोटी 90 लाख इतकी झाली आहे. सध्या देशातील करोनाच्या सक्रिय बाधितांची संख्या 5 लाख 52 हजार 659 इतकी आहे. देशाचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट 2.74 टक्के इतका झाला आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click