July 4, 2022

दहशतवादी कारवाई,टूलकीट नंतर धर्मांतरण प्रकरणात बीड चर्चेत !

दहशतवादी कारवाई,टूलकीट नंतर धर्मांतरण प्रकरणात बीड चर्चेत !

बीड – दहशतवादी कारवायांमध्ये 2006 साली समोर आलेले बीड कनेक्शन आणि त्यानंतर टूलकीट प्रकरणी चर्चेत आलेले बीड पुन्हा एकदा चर्चेत आले आहे .उत्तर प्रदेशमध्ये बेकायदेशीर धर्मांतर करणाऱ्या तीन तरुणांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये बीडमध्ये राहणाऱ्या इरफान शेखचा समावेश असल्याची माहितीसमोर आली आहे. त्यामुळे बीडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी ताब्यात घेतलेला इरफान खान हा मूळचा बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील शिरसाळा येथील रहिवासी आहे, तो सध्या दिल्लीत वास्तव्यास आहे. दिल्लीतील मिनिस्ट्री ऑफ चाइल्ड वेल्फेअरमध्ये इंटरप्रीटेटर म्हणून काम करतो. मात्र इरफानला अवैध धर्मांतर प्रकरणांमध्ये यूपी एटीएसने ताब्यात घेतलेला आहे.

अहमदाबाद येथील आयोजित विद्यालयात कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. यावेळी सिरसाळा गावचे भूमीपुत्र माझे लहान भाऊ प्रा. इरफान खाजा खॉ. पठाण यांचं उत्कृष्ट कार्याबद्दल व्यासपीठावर स्वत: नरेंद्र मोदी यांनी कौतूक करत शाब्बासकीची थाप मारली व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या, असं त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं.

अवैध धर्मांतरण प्रकरणांमध्ये इरफानचं नाव आल्यामुळे परिवाराला धक्का बसला आहे. इरफान असं करू शकत नाही, असं त्यांच्या मामांच्या म्हणणंआहे. मात्र बोलण्यास नकार दिला माहिती घेऊन बोलू, असं त्यांनी सांगितलं.

उत्तर प्रदेशमधील शेकडो हजारों निरपराध मुले, महिला आणि इतरांच्या धर्मांतराबाबत उत्तर प्रदेश एटीएसनं धक्कादायक खुलासा केला. या प्रकरणामागे पाकिस्तानचा हात असल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला. लवकरच उत्तर प्रदेश सरकार केंद्रीय गृह मंत्रालयाला लेखी पत्र देऊन या प्रकरणाची माहिती देणार असून, राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि गुप्तचर यंत्रणेकडं या प्रकरणाची चौकशी सोपवली जाऊ शकते.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली असून, यामध्ये सामील असलेल्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश तपास यंत्रणांना दिले आहेत. दोषींवर गँगस्टरवर करतात त्या पद्धतीची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. आरोपींची मालमत्ता जप्त करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click