December 6, 2022

अट्टल दरोडेखोरांची टोळी जेरबंद !

अट्टल दरोडेखोरांची टोळी जेरबंद !


बीड : जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, शिरुर तालुक्यात घरफोड्या करणारे अट्टल दरोडे खोरांच्या टोळीचा स्थानीक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून चौघां जणांना जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून सहा तोळे सोन्यासह 68 हजार रुपये नगदी असा 2 लाख 26 हजार रुपयांचा मुद्देमाल व एक दुचाकी जप्त केली. अटक केलेल्या दरोडेखोरांनी यापूर्वी 14 गुन्हे केल्याची कबुली पोलीसांना दिली आहे.

जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, शिरुर येथे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात घरफोडया झाल्या होत्या. पाटोदा तालुक्यातील नफरवाडी येथील नामदेव विठ्ठल मंडलीक यांचे भरदिवसा घर फोडले होते. याप्रकरणी त्यांनी पाटोदा पोलीसात रितसर तक्रार दिली होती. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असतांना स्थानीक गुन्हे शाखेला या दरोडेखोराच्या टोळीबद्दल माहिती मिळाल्यानंतर त्यांनी काल आष्टीत सापळा रचून चौघांच्या मुसक्या आवळल्या.

त्यांची पोलीसांनी कसून चौकशी केली असता त्यांनी 14 गुन्हे केल्याची कबूली दिली. यात एक रोड रॉबरी तर 13 घरफोड्या करुन लाखोचा मुद्देमाल हडप केला आहे. पोलीसांनी चौघांनाही ताब्यात घेतले. तेव्हा त्यांच्याजवळ 6 तोळे सोने, 68 हजाराची कॅश व एक मोटार सायकल मिळून आली. पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या पैकी नवनाथ उर्फ मटक्या ईश्‍वर भोसले(रा. बेलगांव ता.कर्जत, जि.अहमदनगर, वय-20 वर्षे,) दिपक उर्फ पल्या ईश्‍वर भोसले (रा. बेलगांव ता.कर्जत, जि.अहमदनगर, वय-28 वर्षे,) गहिनीनाथ ईश्‍वर भोसले (रा. बेलगांव ता.कर्जत, जि.अहमदनगर, वय-33 वर्षे,) चिमन्या मैदान भोसले (रा. कासारी ता.केज.जि.बीड वय-36 वर्षे,)हे आहेत.

नफरवाडीत घरफोडीत गहिनीनाथ हा नव्हता गहिनीनाथ यांने नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक घरफोडी केली होती. त्याच्या शोधात नेकनूर पोलीस होते. स्थानीक गुन्हे शाखेने या चौघांच्या मुसक्या आवळल्यानंतर त्यांनी 14 गुन्हे केल्याची कबूली दिली. पुढील तपासासाठी चौघांना पाटोदा पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले. सदरील कारवाई स्थानीक गुन्हे शाखेचे पिआय भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पिएसआय संतोष जोंधळे, पिएसआय भगत दुल्लत, जगताप, डोळस, शेख नसीर, रामदास तांदळे, प्रसाद कदम, सतिष कातखडे, सोमनाथ गायकवाड, मुन्ना वाघ, अशोक दुबाले, नरेंद्र बांगर, बागवान, पवार, ठोंबरे, कुळेकर, वंजारे, हरके, हराळे यांनी केली.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click