बीड – जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा शुक्रवारच्या तुलनेत वीस ने कमी झाला .3677 रुग्णांची तपासणी केली असता त्यात 3521 निगेटिव्ह आणि 156 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले .
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई 10,आष्टी 36,बीड 17,धारूर 3,गेवराई 24,केज 26,माजलगाव 6,परळी 2,पाटोदा 9,शिरूर 8 आणि वडवणी मध्ये 15 रुग्ण आढळून आले आहेत .
बीड जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून रुग्णसंख्या कमी होत असल्याचे चित्र आहे मात्र लोकांची बेफिकिरी अजूनही कमी झालेली नाही,त्यामुळे बीड जिल्ह्यातील निर्बंध कमी झालेले नाहीत .