November 28, 2021

जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा पुन्हा वाढला !

जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा पुन्हा वाढला !

बीड जिल्ह्यात आज दि 25 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 3786 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 176 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3610 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 3 आष्टी 63 बीड 13 धारूर 3 गेवराई 24 केज 14 माजलगाव 6 पाटोदा 28,परळी 4 शिरूर 15 वडवणी 3 असे रुग्ण आढळून आले आहेत.

राज्यात कोरोना रुग्ण संख्येत चढउतार

राज्यातील गेल्या 24 तासांमधील कोरोना आकडेवारी समोर आली आहे. राज्यात कोरोना रुग्णसंख्येत चढ उतार कायम आहेत. दिवसभरात राज्यात एकूण 9 हजार 844 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 9 हजार 371 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर दिवसभरात एकूण कोरोनामुळे 197 जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आतापर्यंत एकूण 57 लाख 62 हजार 661 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 95.93 % इतका झाला आहे. राज्याचा मृत्यूदर हा 2 टक्के इतका झाला आहे.

राज्यात ताज्या आकडेवारीनुसार एकूण 1 लाख 21 हजार 767 सक्रीय रुग्ण आहेत. या रुग्णांवर कोरोनाचे उपचार सुरु आहेत.

देशात गेल्या २४ तासांत ५१ हजार ६६७ नवे रुग्ण

गेले दोन दिवस देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत किंचित वाढ होत होती. मात्र आज तिसऱ्या दिवशी नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली आहे. देशात गेल्या २४ तासांत ५१ हजार ६६७ नव्या कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १ हजार ३२९ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ६४ हजार ५२७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. देशातील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ कोटी १ लाख ३४ हजार ४४५वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ३ लाख ९३ हजार ३१० जणांचा मृत्यू झाला असून २ कोटी ९१ लाख २८ हजार २६७जण कोरोनामुक्त झाले आहेत.

देशात सध्या ६ लाख १२ हजार ८६८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

hotel_anvita

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *